Advertisement

गणराज डुबारबावने याचा कन्हान नदीत मृतदेह आढळला

गणराज डुबारबावने याचा कन्हान नदीत मृतदेह आढळला

कन्हान : - गजराज उर्फ डोमा तुकाराम डुबारबावने यांचा मृतदेह नदीत आढळुन आल्याने कन्हान पोलीसांनी मर्ग चा गुन्हा दाखल केला.


शनिवार (दि.२५) ऑक्टोंबर ला गजराज उर्फ डोमा तुकाराम डुबारबावने वय ३७ वर्ष रा. सुदर्शन नगर पिपरी यास मिरगीचा असल्याचे सांगण्यात येते . तो कन्हान नदीत गेल्यावर त्याला मिरगी आल्यामुळे तो पाण्यात पडुन राहिला . स्थानिक नागरिकांना तो  बेशुध्द अवस्थेत आढळुन आला . सदर घटनेची माहिती कन्हान पोलीसांना मिळताच पोलीसांनी घटनास्थळी पोहचुन त्यास प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान येथे नेले असता डॉक्टरांनी तपासुन मृत घोषित केले  . पोलीसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह उपजिल्हा रूग्णालय कामठी येथे शवविच्छेदना करिता पाठवले . शवविच्छेदना नंतर त्याचा मृतदेहाचा पिपरी घाटावर अंतिम संस्कार करण्यात आला . कन्हान पोलीसांनी मर्ग चा गुन्हा नोंद करून पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशनचे पी एस आय एकनाथ राठोड करित आहे. 


ढिवर समाज सेवा संघटना व्दारे डोमाजी च्या परिवारास आर्थिक मदत


ढिवर समाज सेवा संघटना कन्हानचे पदाधिकारी यांनी कन्हान नदीत बुडुन मरण पावलेल्या डोमाजी डुबरबावने यांचे घरी पोहचुन संघटनेचे अध्यक्ष सुतेश मारबते याच्या हस्ते त्यांच्या पत्नी अनुसयाबाई डोमा डुबरबावणे यांना तीन हजार रूपये देऊन आर्थिक मदत करण्यात आली . याप्रसंगी प्रामुख्याने संघटनेचे उपाध्यक्ष बालचंद बोंदरे , कोषाध्यक्ष अँड. श्रीकांत मानकर , कार्यकारीणी सदस्य गितेश मोहने , सुरेखा  भोयर , कुंदा कांबळे , कार्यकर्ते रवि खंडाटे , विकास दुधबावणे , रवि मेश्राम , धनराज दुधाबावणे , नरेश दुधबावणे , राजकुमार खंडाटे आदीनी उपस्थित राहुन डोमाजी डुबरबावने च्या परिवारास सात्वना दिली . 


कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या